१०० वर्षे विश्वासाची...

२०१७ साली १०० व्या वर्षात पदार्पण केलेल्या 'नेर्लेकर बुक डेपो' संस्थेची स्थापना श्री. बाळकृष्ण महादेव नेर्लेकर यांनी केली. १९७७ पासून श्री. दत्तात्रय (अरुण) नेर्लेकर यांनी ही संस्था पुढे चालू ठेवली ती आजपर्यंत..

भारतीय तत्त्वज्ञानाने जगाला भुरळ पाडली आहे. मराठी संतसाहित्य, योगाभ्यास, थोर व्यक्तींची चरित्रे, ज्योतिष, वास्तुशास्त्र तसेच आयुर्वेदिक मार्गोपदेशक ग्रंथांना देशातूनच नाही तर परदेशातूनही मागणी वाढत आहे असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे.

धार्मिक, आध्यात्मिक, ज्योतिष, वास्तुशास्त्र, आयुर्वेदिक तसेच दुर्मीळ ग्रंथ व पुस्तके ग्राहकांस उपलब्ध करून देण्यास आम्ही प्रयत्नशील असतो. त्याचबरोबर आमच्या येथे विक्रीसाठी उपलब्ध असलेले प्रमाणबद्ध व शुद्धता जपलेले पूजेचे साहित्य, देव-देवतांची सिद्धयंत्रे हे आमचे वैशिष्ट्य आहे.

आत्तापर्यंत बरोबर असलेल्या वाचकांसाठी आणि नवीन वाचक परिवार जोडण्यासाठी आम्ही संपूर्ण भारत आणि जगभरात ही सेवा egranthalay द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत.

 

- सारंग दत्तात्रय नेर्लेकर

Updating Quantity Go To Cart